कडू श्री. बच्चू ऊर्फ ओमप्रकाश बाबाराव
मतदारसंघ : ४२-आचलपूर
पक्षाचे नाव : अपक्ष
जन्मतारीख : 1970-07-05
शिक्षण : बी.पी.एड
छंद : सामाजिक कार्य व रूग्णांची सेवा
सध्याचा पत्ता :
"(१) मु.पो. बेलोरा, तालुका चांदूर बाजार, जिल्हा-अमरावती. दूरध्वनी : (०७२२७) २३४१०७ (२) क-६६ व ११४, मनोरा आमदार निवास, मुंबई. दूरध्वनी : २२८५४५४५"
कायमचा पत्ता :
"(१) मु.पो. बेलोरा, तालुका चांदूर बाजार, जिल्हा-अमरावती. दूरध्वनी : (०७२२७) २३४१०७ (२) क-६६ व ११४, मनोरा आमदार निवास, मुंबई. दूरध्वनी : २२८५४५४५"
इतर माहिती:
"आठव्या इयत्तेत शिकत असताना गावातील तमाशा बंदी करिता आंदोलन; १९९४ शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशांकरिता आंदोलन; कापूस व बीज प्रश्नाकरिता डेरा आंदोलन, आदिवासींच्या जमिनीकरिता अर्ध-दफन आंदोलन; स्वतःच्या लग्नाच्या खर्चातून बचत करून २५० अपंगांना लग्न समारंभात ३ चाकी सायकली व कृत्रिम अवयवांचे वाटप; विद्यार्थ्यासाठी पुस्तकपेढी योजना तयार केली; पूर्णा उत्सवांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; विदर्भ- स्तरीय कुस्ती व कब्बड्डी स्पर्धांचे आयोजन; १५०० हृदय रुग्णांना दत्तक घेऊन उपचार व शस्त्रक्रिया; २०० ब्रेन ट्युमरच्या रुग्णांवर मुंबई येथे सर्वतोपरी उपचार; १०० कर्करोग रुग्णांना वैद्यकीय सहाय्य व सर्वतोपरी मदत; २००० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, १००० रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन १५,००० बाटल्या रक्त के.ई.एम. रुग्णालय, मुंबई जनरल हॉस्पिटल, अमरावती व मेडिकल कॉलेज, नागपूर येथील रक्तपेढ्यांना पुरवठा केला; स्वतः ५० वेळा रक्तदान केले;१९८९-९२ भारतीय विद्याथी सेनेचे प्रमुख; १९९२-९८ शिवसेना तालुका प्रमुख; १९९९ प्रहार संघटनेची स्थापना, या संघटनेचे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषदेमध्ये ९६ सदस्य निवडून आणण्यात यश; १९९३-९८ सदस्य, ग्रामपंचायत; १९९७-२००२ सद्स्य व १९९७-९८ सभापती, पंचायत समिती, चांदूर बाजार; १९९७-९८ सदस्य, जिल्हा परिषद, अमरावती; २००४-२००९ सदस्य, महाराष्ट्रविधानसभा; ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड."
| वर्ष | पद | पक्ष |
|---|---|---|
| २०१९ | अचलपूरमधून आमदार म्हणून निवडून आले | अपक्ष |
| २०१४ | अचलपूरमधून आमदार म्हणून निवडून आले | अपक्ष |
| २००९ | अचलपूरमधून आमदार म्हणून निवडून आले | अपक्ष |
| २००४ | अचलपूरमधून आमदार म्हणून निवडून आले | अपक्ष |
| पक्ष | साल | विजेता | उमेदवार | मत | मतदार संघ |
|---|---|---|---|---|---|
| अपक्ष | २०१४ | बच्चू अलियास ओमप्रकाश बाबराव कडू | बच्चू अलियास ओमप्रकाश बाबराव कडू | ५९२३४ | ४२-आचलपूर |
| भारतीय जनता पार्टी | अशोक श्रीधरपंत बनसोड | ४९०६४ | |||
| अपक्ष | २००९ | बच्चू एलियास ओमप्रकाश बाबाराव कडू | बच्चू एलियास ओमप्रकाश बाबाराव कडू | ६०६२७ | ४२- अचलपूर |
| इंडियन नॅशनल कॉँग्रेस | वसुद्धताई पुंडलीक देशमुख | ५४८८४ | |||
| अपक्ष | २००४ | ओमप्रकाश अलियास बाबाराव कडू | ओमप्रकाश अलियास बाबाराव कडू | ५६४७१ | १२० -अचलपूर |
| इंडियन नॅशनल कॉँग्रेस | वासुद्धताई पुढलिक देशमुख | ५१०८५ |
