लोढा श्री. मंगलप्रभात
मतदारसंघ : १८५-मलाबार हिल
पक्षाचे नाव : राष्ट्र्वादी कॉग्रेंस पक्ष
जन्मतारीख : 1955-12-18
शिक्षण : बी. कॉम., एलएल.बी., सी.ए. (इंटर)
छंद : वाचन व सामाजिक कार्य
सध्याचा पत्ता :
१२, अनुपम, मानव मंदिर रोड, मलबार हिल, वाळकेश्वर, मुंबई - ४०० ०२६
कायमचा पत्ता :
१२, अनुपम, मानव मंदिर रोड, मलबार हिल, वाळकेश्वर, मुंबई - ४०० ०२६
इतर माहिती:
सरचिटणीस, विद्यार्थी संघटना जोधपूर विद्यापीठ; १९७३-७५ जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्माण चळवळी- मध्ये विद्यार्थ्यांचे नेतृत्व; स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; आणीबाणीत स्थानबध्द; अध्यक्ष, दक्षिण मुंबई कारसेवा समिती; रामजन्मभूमी चळवळीचे नेतृत्व; १९९०-१९९२ मध्ये चलो अयोध्या चळवळीत सहभाग, व्ही. टी. रेल्वे स्थानकाचे नामांतर व अंजूमन इस्लाममध्ये बहुसंख्यांक समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी मोर्चाचे आयोजन; सचिव, सिटीझन्स ऑर्गनायझेशन फॉर पब्लिक ओपिनियन; उपाध्यक्ष (दोन वेळा) मुंबई भाजप; अध्यक्ष, जैन कुशल मंडळ आणि महावीर इंटरनॅशनल, मुंबई, सदस्य, लायन्स क्लब मलबार हिल; ताडदेव परिसर विकासात सहभाग; नगरसेवक, मुंबई महानगरपालिका; पूरग्रस्तांसाठी मदत कार्य; गुटखा विरोधी आंदोलन व जनजागरण मोहिम सुरू केली; मलबार हिल ऑलिंपिक्सद्वारा विविध स्पर्धांचे आयोजन; सामूहिक दीपोत्सव, गणोशोत्सव व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, हळदीघाट, जालियनवाला बाग, झाशी यासारख्या धार्मिक, ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य रहावे यासाठी विविध प्रयत्न; बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी मोफत सेवायोजन विभागाची निर्मिती; ९ ऑगस्ट १९९७ रोजी क्रांतीदिनी भारत जोडोसाठी मानवी साखळीचे आयोजन; सामूहिक गोविंदा, आरोग्य तपासणी, रक्तगट तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिक सहल, गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप, विद्यार्थ्यांकडून माफक शैक्षणिक शुल्क घेण्यात यावे यासाठी प्रयत्न; दिवाळी सणानिमित्त ना नफा ना तोटा तत्त्वावर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन; १९९७ महाराष्ट्रात प्रथमच माहितीचा अधिकार हे अशासकीय विधेयक आणले व या विषयावर योग्य चर्चा घडविली; १९९५-९९, १९९९-२००४, २००४- २००९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; ऑक्टोबर २००९ मध्ये विधानसभेवर फेरनिवड.
| वर्ष | पद | पक्ष |
|---|---|---|
| १९९५ | मलबार हिलमधून आमदार म्हणून निवडून आले | भारतीय जनता पक्ष |
| २००९ | मलबार हिलमधून आमदार म्हणून निवडून आले | भारतीय जनता पक्ष |
| २०१४ | मलबार हिलमधून आमदार म्हणून निवडून आले | भारतीय जनता पक्ष |
| २०१९ | मलबार हिलमधून आमदार म्हणून निवडून आले | भारतीय जनता पक्ष |
| पक्ष | साल | विजेता | उमेदवार | मत | मतदार संघ |
|---|---|---|---|---|---|
| भारतीय जनता पार्टी | २०१४ | मंगल प्रभात लोढा | मंगल प्रभात लोढा | ९७८१८ | १८५-मलाबार हिल |
| शिवसेना | अरविंद (अर्जुन) देवजी दूधवाडकर | २९१३२ | |||
| भारतीय जनता पार्टी | २००९ | मंगल प्रभात लोढा | मंगल प्रभात लोढा | ५८५३० | १८५ - मलबार हिल |
| इंडियन नॅशनल कॉँग्रेस | राजकुमार सुमेरमाल बाफणा | ३३९७१ | |||
| भारतीय जनता पार्टी | २००४ | मंगल प्रभात लोढा | मंगल प्रभात लोढा | ४१३६५ | २४ - मलाबर हिल |
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | राज श्रोफ्फ | ३८०५२ |
