भुजबळ श्री. छगन चंद्रकांत
मतदारसंघ : ११९- येवला
पक्षाचे नाव : राष्ट्र्वादी कॉग्रेंस पक्ष
जन्मतारीख : 1947-10-15
शिक्षण : एल.एम.ई.(I)
छंद : वाचन, क्रिकेट, चित्रपट व प्रवास
सध्याचा पत्ता :
"(१) मिलिशिया अपार्टमेंट, म्हातारपाखाडी रोड, माझगांव, मुंबई - ४०० ०१०. (२) निवास- 'रामटेक', नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई-४०० ००६"
कायमचा पत्ता :
"(१) मिलिशिया अपार्टमेंट, म्हातारपाखाडी रोड, माझगांव, मुंबई - ४०० ०१०. (२) निवास- 'रामटेक', नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई-४०० ००६"
इतर माहिती:
संस्थापक-अध्यक्ष, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट बांद्रा, मुंबई व भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक; माजी विश्वस्त, व्ही.जे.टी.आय. संस्था, मुंबई; संस्थापक, महात्मा फुले समता परिषद, या संस्थेमार्फत उपेक्षित पद-दलित, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसार; माजी विश्वस्त, मुंबई पोर्ट- ट्रस्ट; १९८५ "देवत" व १९९० " नवरा बायको" या मराठी चित्रपटांची निर्मिती; १९७३ सदस्य, १९७३-८४ विरोधी पक्षनेते, १९८५ व १९९१ महापौर, मुंबई महानगर- पालिका; १९९१ अध्यक्ष, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स; १९९१ पर्यंत शिवसेनेत, १९९१ नंतर कॉँग्रेस पक्षात कार्यरत, जून १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; संस्थापक-सदस्य व जून १९९९ ते नोव्हेंबर १९९९ महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; १९८५- ९०, १९९०-९५, २००४-२००९ सदस्य; महाराष्ट्र विधानसभा; १९९६-२००२ व २००२-२००४ सदस्य, महाराष्ट्र विधान- परिषद; डिसेंबर १९९१ ते मार्च १९९३ महसूल खात्याचे मंत्री; मार्च १९९३ ते मार्च १९९५ गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती आणि पुनर्बाधणी खात्याचे मंत्री; १९९६-१९९९ विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधानपरिषद; ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह आणि पर्यटन मंत्री, नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००३ मुंबई शहराचे पालकमंत्री; जानेवारी २००३ ते डिसेंबर २००३ उपमुख्यमंत्री व गृह मंत्री; नोव्हेंबर २००४ ते ऑक्टोबर २००९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री; ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; नोव्हेंबर २००९ मध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री.
| वर्ष | पद | पक्ष |
|---|---|---|
| १९८५ | मुंबईतील माझगावमधून आमदार म्हणून निवडून आल | शिवसेना |
| १९९० | मुंबईतील माझगावमधून आमदार म्हणून निवडून आल | शिवसेना |
| २००४ | येवल्यातून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| २००९ | येवल्यातून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| २०१४ | येवल्यातून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| २०१९ | येवल्यातून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| पक्ष | साल | विजेता | उमेदवार | मत | मतदार संघ |
|---|---|---|---|---|---|
| नॅशनल कोंग्रेस पार्टी | २०१४ | छगन भुजबळ | छगन भुजबळ | ११२७८७ | ११९- येवला |
| शिवसेना | संभाजी साहेबराव पवार | ६६३४५ | |||
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | २००९ | छगन भुजबळ | छगन भुजबळ | १०६४१६ | ११९ - एवला |
| शिवसेना | ॲड माणिकराव मधवराव शिंदे - पाटील | ५६२३६ | |||
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | २००४ | छगन भुजबळ | छगन भुजबळ | ७९३०६ | ७१ - एवला |
| शिवसेना | कल्यानराव जयंतराव पाटील | ४६३५७ |
