भुसे श्री. दादाजी दगडू
मतदारसंघ : ११५- मालेगाव आउटर
पक्षाचे नाव : शिवसेना
जन्मतारीख : 1964-03-06
शिक्षण : डी.सी.ई.
छंद : समाजसेवा व वाचन करणे
सध्याचा पत्ता :
"(१) 'शिवा', व्यंकटेश नगर, सोयगांव, तालुका मालेगाव, जिल्हा - नाशिक. (२) कार्यालय - 'शिवनेरी' मोसमपुल मालेगाव (नाशिक). (३) क-२१, मनोरा आमदार निवास, मुंबई."
कायमचा पत्ता :
"(१) 'शिवा', व्यंकटेश नगर, सोयगांव, तालुका मालेगाव, जिल्हा - नाशिक. (२) कार्यालय - 'शिवनेरी' मोसमपुल मालेगाव (नाशिक). (३) क-२१, मनोरा आमदार निवास, मुंबई."
इतर माहिती:
शिवसेना तालुका प्रमुख, मालेगाव; पक्षाच्या सर्व उपक्रमांत सक्रीय सहभाग; जागर शिवशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली; संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन अनुदान योजना व श्रावण बाळ योजनेचे अनुदान लाभार्थीना मिळवून दिले; रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा यासारखी सामाजिक कामे केली; महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या; शासकीय पडिक जागा व गावठाणातील सरकारी जमीन १५००० लाभार्थीना मिळवून दिली; वन हक्क समितीच्या माध्यमातून वन जमिनी नियमित केल्या; दारिद्र्य रेषेखालील व्यक्तिना मदत; मालेगाव येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न; आमआदमी विमा योजना, स्वर्णजयंती ग्रामीण रोजगार योजना राबविली; लोकसहभागातून अे.पी.जे. अब्दुल कलाम बंधारा तयार केला; गरीबांना अल्प किमतीत घरे मिळवून दिली; भारतनिर्माण व राष्ट्रीय पेय जल अंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली; सामुहिक विवाह, गोरगरीब रुग्णांना मदत, रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन; रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली; शालोपयोगी वस्तुंचे बाटप; संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केले; जिमखाना सुरू केला; व्यसनमुक्ती व स्वच्छता अभियान राबविले; वनहक्क समितीद्वारे वन जमीन नियमित करणे, जागर शिवशाहीचा कार्यक्रमाच्या माध्यमातून जातीचे दाखले मिळवून देणे इ. कार्य केले; २००४-२००९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; ऑक्टोबर २००९ मध्ये विधानसभेवर फेरनिवड.
| वर्ष | पद | पक्ष |
|---|---|---|
| २०१९ | मालेगाव बाह्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले | शिवसेना |
| २०१४ | मालेगाव बाह्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले | शिवसेना |
| २००९ | मालेगाव बाह्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले | शिवसेना |
| पक्ष | साल | विजेता | उमेदवार | मत | मतदार संघ |
|---|---|---|---|---|---|
| शिवसेना | २०१४ | दादाजी दगडू भुसे | दादाजी दगडू भुसे | ८२०९३ | ११५- मालेगाव आउटर |
| भारतीय जनता पार्टी | पवन यशवंत ठाकरे | ४४६७२ | |||
| शिवसेना | २००९ | दादाजी दगडू भुसे | दादाजी दगडू भुसे | ९५१३७ | ११५ - मालेगाव बाह्य |
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | प्रशांत व्यंकतराव हिरे | ६५०७३ | |||
| अपक्ष | २००४ | दादाजी दगडू भुसे | दादाजी दगडू भुसे | ६८०७९ | ७४ - दाभाडी |
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | हिरे प्रशांत व्यंकटराव | ५९०६२ |
