Close

Recent Search Keywords

  • Finance
  • Idea
  • Service
  • Growth
  • Plan

  • लॉग आउट
  • मुख्यपृष्ठ
  • विधिमंडळ
    • राज्यपाल
    • विधानपरिषद
    • विधानसभा
    • विधानमंडळ सचिव
    • मंत्रीमंडळ
    • विधानमंडळ समित्या
    • विधानमंडळ ग्रंथालय
  • विधानमंडळ सदस्य
    • विधानपरिषद सदस्य
    • विधानसभा सदस्य
  • सभागृहांचे कार्यवृत्त
    • एकत्रित सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानपरिषद सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानसभा सभागृहांचे कार्यवृत्त
  • अर्थसंकल्प
  • विधिविधान
    • विधानपरिषद दस्तऐवज
    • विधानसभा दस्तऐवज
  • निवडणूक निकाल
    • राज्यसभा - महाराष्ट्र राज्य
    • लोकसभा - महाराष्ट्र राज्य
    • महाराष्ट्र विधानपरिषद
    • महाराष्ट्र विधानसभा
  • प्रकाशने
    • शासकीय समित्या
    • शासकीय अहवाल
    • शासकीय योजना
    • शासकीय धोरणे
    • इतर शासकीय प्रकाशने
    • दर्शनिका
  • विविध
    • बातम्या
    • फोटो गॅलरी
    • इतर पोर्टल्सच्या लिंक्स
    • सोशल मीडिया लिंक्स
    • उपयोगकर्ता पुस्तिका
    • मदत कक्ष
    • संपर्काची माहिती
    • अभिप्राय
    • साइट मॅप
  • बुकमार्क
    • View

राज्यपाल

user

श्री भगत सिंह कोश्यारी (२०१९-चालू तारीख)

5 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला

जन्म दिनांक : १७.०६.१९४२

जन्म ठीकाण :

पलंधुरा चेतबगढ, बागेश्वर जिल्हा, उत्तराखंड

शिक्षण :

उत्तराखंड मध्ये प्रारंभिक शिक्षण, इंग्रजीमध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन


राजकीय कारकीर्द :

"महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी हे उत्तराखंड राज्याच्या राजकारणातील एक धुंरधर लोकनेते राहिले आहेत. दिनांक १७ जून १९४२ रोजी जन्मलेले भगत सिंह कोश्यारी अल्मोडा महाविद्यालय येथे शिकत असताना विद्यार्थी संघटनेचे महासचिव म्हणून निवडून आले. त्यानंतर त्‍यांनी उत्तरप्रदेश मधील एटा येथे काही काळ अध्यापनाचे कार्य केले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे निष्ठावान स्वंयसेवक असलेल्या कोश्यारी यांना आणिबाणीला विरोध केल्यामुळे सन १९७५ ते १९७७ या कालावधीत तुरुंगवास भोगावा लागला.

सन १९९७ साली ते उत्तर प्रदेश विधान परिषदेवर निवडून गेले. उत्तराखंड राज्याच्या निर्मिती नंतर तेथील पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते उर्जा, पाटबंधारे,न्याय व विधी मंडळ कामकाज मंत्री झाले. सन २००१ साली ते उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री झाले. सन २००२ ते २००७ या कालावधीमध्ये ते उत्तराखंड राज्य विधानसभेमध्ये विरोधीपक्ष नेते होते. सन २००८ साली कोश्यारी उत्तराखंड राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले. ते भारतीय जनता पक्षाचे आखिल भारतीय उपाध्यक्ष तसेच उत्तराखंड राज्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखिल राहिले आहेत. सन २०१४ साली ते नैनिताल-उधमसिंगनगर लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले.

समाजसेवेचा पिंड असलेल्या कोश्यारी यांनी उत्तराखंड राज्यात अनेक शाळा व महाविद्यालयांची स्थापना केली. कोश्यारी यांचा जनसंपर्क दांडगा असून उत्तराखंड राज्यातील टिहरी धरण प्रकल्पग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

उत्तराखंड मधील पिथोरगड येथुन प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘पर्वत पियुष’ या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक राहिले आहेत. त्यांची दोन पुस्तके ‘उत्तरांचल प्रदेश क्यो?’ आणि ‘ उत्तरांचल: संघर्ष एवं समाधान’ प्रकाशित झाली आहेत. दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. दिनांक १९ ऑगष्ट २०२० रोजी त्यांनी गोव्याच्या राज्यपाल पदाची (अतिरिक्त पदाची) शपथ घेतली. दिनांक १९ ऑगस्ट २०२० ते १४ जुलै २०२१ या कालावधीत राज्यपाल कोश्यारी यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी पार पाडली."

  • माननीय राज्यपाल
  • मा. राज्यपालांचे अभिभाषण
  • 2022

    १. मराठी

    २. इंग्रजी

    ३. हिंदी

    2021

    १. मराठी

    २. इंग्रजी

    ३. हिंदी

    2020

    १. मराठी

    २. इंग्रजी

  • डेमो पोर्टल - अंतर्गत वापरासाठी