तालिका सभापती (श्री. मोहन जोशी) : आजच्या कामकाजपत्रिकेतील अनुक्रमांक-२ व ३ वरील लक्षवेधी सूचना देणारे माननीय सदस्य सभागृहात उपस्थित नसल्यामुळे, मी अनुक्रमांक-४ वरील लक्षवेधी सूचना पुकारीत आहे.
श्री. नारायण राणे : सभापती महोदय, लक्षवेधी सूचना देणारे माननीय सदस्य सभागृहात उपस्थित नाहीत, त्यामुळे लक्षवेधी सूचना पुढे ढकलणे योग्य होणार नाही, संबंधित लक्षवेधी सूचना लॅप्स करावी लागेल. पुढे नेता येणार नाही.
श्री. छगन भुजबळ : सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी जो मुद्दा उपस्थित केला तो अगदी रास्त आहे. लक्षवेधी सूचनेसंबंधी आम्हाला काल रात्री सूचना मिळाल्यामुळे आम्ही तयारी करून सभागृहात उपस्थित राहिलो आहोत. त्यामुळे माननीय सदस्य सभागृहात उपस्थित नाहीत म्हणून लक्षवेधी सूचना पुढे ढकलणे योग्य होणार नाही.
१८\६
श्री. नारायण राणे : संबंधित सदस्यांना आपण समज दिली पाहिजे.
तालिका सभापती : ठीक आहे. आता लक्षवेधी सूचना क्रमांक-२ पुकारण्यात येत आहे.