Close

Recent Search Keywords

  • Finance
  • Idea
  • Service
  • Growth
  • Plan

  • लॉग आउट
  • मुख्यपृष्ठ
  • विधिमंडळ
    • राज्यपाल
    • विधानपरिषद
    • विधानसभा
    • विधानमंडळ सचिव
    • मंत्रीमंडळ
    • विधानमंडळ समित्या
    • विधानमंडळ ग्रंथालय
  • विधानमंडळ सदस्य
    • विधानपरिषद सदस्य
    • विधानसभा सदस्य
  • सभागृहांचे कार्यवृत्त
    • एकत्रित सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानपरिषद सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानसभा सभागृहांचे कार्यवृत्त
  • अर्थसंकल्प
  • विधिविधान
    • विधानपरिषद दस्तऐवज
    • विधानसभा दस्तऐवज
  • निवडणूक निकाल
    • राज्यसभा - महाराष्ट्र राज्य
    • लोकसभा - महाराष्ट्र राज्य
    • महाराष्ट्र विधानपरिषद
    • महाराष्ट्र विधानसभा
  • प्रकाशने
    • शासकीय समित्या
    • शासकीय अहवाल
    • शासकीय योजना
    • शासकीय धोरणे
    • इतर शासकीय प्रकाशने
    • दर्शनिका
  • विविध
    • बातम्या
    • फोटो गॅलरी
    • इतर पोर्टल्सच्या लिंक्स
    • सोशल मीडिया लिंक्स
    • उपयोगकर्ता पुस्तिका
    • मदत कक्ष
    • संपर्काची माहिती
    • अभिप्राय
    • साइट मॅप
  • बुकमार्क
    • View

खंड  १५८ 

क्रमांक  २०

दिनांक ९ एप्रिल २०११ 

२०/१८

नियम ९३ च्या सूचना

       उपसभापती : सन्माननीय सदस्य श्री. जयंत प्र. पाटील, वि.प.स. यांनी "पेण, जिल्हा रायगड येथील तालुका कृषी अधिकारी श्री. अशोक चव्हाण यांनी दिनांक ६ एप्रिल २०११ रोजी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांबाबत अश्लील उद्गार काढून त्यांचा विनयभंग केला, या तक्रारीची पोलीस ठाण्यात नोंद केल्यावर श्री. अशोक चव्हाण फरार होणे" या विषयावर नियम ९३ अन्वये सूचना दिली आहे. तो नियम ९३ चा विषय होत नसल्याने, मी सूचनेस अनुमती नाकारीत आहे. मात्र या विषयावर शासनाने निवेदन करावे.

       यानंतर सन्माननीय सदस्य सर्वश्री. रामनाथ मोते, विनोद तावडे, धनंजय मुंडे व संजय केळकर वि.प.स. यांनी "डोंबिवलीत औद्योगिक क्षेत्र भूखंडावरील असलेल्या सदनिकांत राहणाऱ्या लाखो रहिवाशांना प्रशासनाने दिनांक ३१ मार्च २०११ रोजी पाठविलेली नोटिस,नोटिस काढण्याआधी रहिवाशी यांच्या समवेत विचारविनिमय न करता प्रशासनाने एकतर्फी वाढविलेल्या ट्रान्सफर फी बाबत" या विषयावर नियम ९३ अन्वये सूचना दिली आहे. तो नियम ९३ चा विषय होत नसल्याने, मी सूचनेस अनुमती नाकारीत आहे. मात्र या विषयावर शासनाने निवेदन करावे.

      यानंतर सन्माननीय सदस्य सर्वश्री.चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, भगवान साळुंखे व धनंजय मुंडे वि.प.स.यांनी "कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाची रिक्‍त पदे भरण्याबाबत,तसेच विद्यापीठाला वेतन अनुदान देण्याचा निर्णय देण्याबाबत" या विषयावर नियम ९३ अन्वये सूचना दिली आहे.तो नियम ९३ चा विषय होत नसल्याने, मी सूचनेस अनुमती नाकारीत आहे.मात्र या विषयावर शासनाने निवेदन करावे.


  • डेमो पोर्टल - अंतर्गत वापरासाठी