Close

Recent Search Keywords

  • Finance
  • Idea
  • Service
  • Growth
  • Plan

  • लॉग आउट
  • मुख्यपृष्ठ
  • विधिमंडळ
    • राज्यपाल
    • विधानपरिषद
    • विधानसभा
    • विधानमंडळ सचिव
    • मंत्रीमंडळ
    • विधानमंडळ समित्या
    • विधानमंडळ ग्रंथालय
  • विधानमंडळ सदस्य
    • विधानपरिषद सदस्य
    • विधानसभा सदस्य
  • सभागृहांचे कार्यवृत्त
    • एकत्रित सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानपरिषद सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानसभा सभागृहांचे कार्यवृत्त
  • अर्थसंकल्प
  • विधिविधान
    • विधानपरिषद दस्तऐवज
    • विधानसभा दस्तऐवज
  • निवडणूक निकाल
    • राज्यसभा - महाराष्ट्र राज्य
    • लोकसभा - महाराष्ट्र राज्य
    • महाराष्ट्र विधानपरिषद
    • महाराष्ट्र विधानसभा
  • प्रकाशने
    • शासकीय समित्या
    • शासकीय अहवाल
    • शासकीय योजना
    • शासकीय धोरणे
    • इतर शासकीय प्रकाशने
    • दर्शनिका
  • विविध
    • बातम्या
    • फोटो गॅलरी
    • इतर पोर्टल्सच्या लिंक्स
    • सोशल मीडिया लिंक्स
    • उपयोगकर्ता पुस्तिका
    • मदत कक्ष
    • संपर्काची माहिती
    • अभिप्राय
    • साइट मॅप
  • बुकमार्क
    • View

खंड  १५८
क्रमांक २१
दिनांक १८ एप्रिल २०११

२१/७

सभागृहाच्या कामकाजासंबंधी

तालिका सभापती : माननीय मंत्रिमहोदयांनी विनंती केल्यामुळे यानंतर अनुक्रमांक ५ वरील सन्माननीय सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलेली अर्धा तास चर्चा चर्चेला घेण्यात येईल. त्यानंतर अनुक्रमांक १ पासून अर्धा तास चर्चा चर्चेला घेण्यात येतील.

प्रा. फौजिया खान : सभापती महोदय, दुपारी १२.०० वाजेपर्यंत अनुक्रमांक १ व २ वरील अर्धा तास चर्चा संपल्यातर बरे होईल. कारण विधानसभा सभागृहामध्ये माझी लक्षवेधी सूचना आहे.

श्री. दिवाकर रावते: आज सकाळी २० मिनिटांकरिता सभागृहाची बैठक स्थगित करण्यात आली. त्या बद्दल माझे काही म्हणणे नाही. खरे म्हणजे पहिल्या दिवशी सोमवारी आपण कधीही अतिरिक्‍त सत्र घेत नाही. मी यासंदर्भात प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्याशी बोललो. मी त्यांना सांगितले की, आपल्याला अर्धा तास चर्चा घ्यावयाच्या असतील तर संबंधितांना आपण दूरध्वनीवरून तसे कळवावे व त्याप्रमाणे व्यवस्था करावी. त्या बद्दल माझे काही म्हणणे नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालण्याचा कार्यक्रम आहे हे माहीत असताना सकाळी १०.३० वाजता सभागृहाची बैठक ठेवण्याचे कारण नव्हते. त्यामुळे सकाळी २० मिनिटे वाया गेली. ती २० मिनिटे वाढवून द्यावीत. सभागृहाची नियमित बैठक २० मिनिटे पुढे ढकलावी. आपण जर न्याय द्यावयाचे ठरविले आहे तर व्यवस्थितपणे न्याय द्यावा. नाही तर मग प्रशासकीय प्रश्‍न निर्माण होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हार घालण्याचा कार्यक्रम आहे, आणि त्यासाठी २० मिनिटे लागतील हे आपल्याला माहीत असताना सभागृहाची बैठक सकाळी १०.३० वाजता कशाला ठेवली, हा विषय येतो. त्या बद्दल मला वाद घालावयाचा नाही. आपण माननीय सभापतींची मंजुरी घेऊन विशेष सत्राच्या कामकाजासाठी २० मिनिटे वाढवून द्यावीत आणि सभागृहाचे नियमित कामकाज दुपारी १.१५
ऐवजी १.३० वाजता सुरू करावे.

तालिका सभापती : ठीक आहे.


  • डेमो पोर्टल - अंतर्गत वापरासाठी