अध्यक्ष : प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे. आता आपण पुढील कामकाजास सुरुवात करूया.
(विरोधी पक्षाचे काही सन्माननीय सदस्य वेलमध्ये येऊन फलक फडकवून घोषणा देतात)
सन्माननीय सदस्यांनी आपापल्या जागेवर बसावे, सन्माननीय सदस्यांनी आपल्या नेत्यांवर विश्वास
ठेवावा. सारखे फलक घेऊन पुढे येऊ नका. आता शोक प्रस्ताव घेण्यात येईल.