
महाराष्ट्र विधिमंडळाला देशात आगळी-वेगळी अशी प्रतिष्ठा लाभली आहे. अनेकविध क्षेत्रांत देशपातळीवर नेतृत्व देणारे नेते या विधिमंडळाने राष्ट्राला दिले आहेत. या नेत्यांनी संसदीय लोकशाही आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाद्वारा सबळ प्रशासनाचा वस्तुपाठ इतरांना घालून दिला आहे आणि त्यायोगे अनेक उत्तम परंपरा, संकेत ब आदर्श निर्माण केले आहेत. भूतपूर्व मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलची (Council of the Governor of Bombay) पहिली बैठक दिनांक २२ जानेवारी १८६२ रोजी...पुढे वाचा

राज्याच्या हीरक महोत्सवाच्या पूर्वसंध्येस म्हणजेच दिनांक २७ नोव्हेंबर, २०१९ रोजी अस्तित्वात आलेल्या चौदाव्या महाराष्ट्र विधानसभेतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे मन:पूर्वक स्वागत. महाराष्ट्र बिधिमंडळाचे मा.पीठासीन अधिकारी यांनी दिलेल्या निदेशानुसार तयार करण्यात आलेली 'महाराष्ट्र बिधानसभा मार्गदर्शिका' ही पुस्तिका आपल्या हाती सोपविताना मला अत्यंत आनंद होत आहे. अनेक चळवळी, आंदोलने, हुतात्म्यांचे बलिदान, हालअपेष्टा सोसून मोठ्या कष्टाने स्वातंत्र मिळविलेल्या आपल्या भारत देशाने...पुढे वाचा